Sujay Vikhe Patil : खासदार सुजय विखेंना 'हा' वाटतोय समाजातील मोठा धोका, केली महत्वाची मागणी

ब्युरो टीम : 'ज्या पद्धतीने नवी पिढी, १८ वर्षांच्या पुढची सुशिक्षित मुलं आणि मुली हे आपल्या आई-वडिलांच्या मनविरहित जाऊन पळून लग्न करायला लागलेले आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे. पळून जाऊन लग्न करण्यावर निर्बंध येण्यासाठी कायदा व्हावा,' असे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. त्यामध्येही लव्ह जिहाद हा एक  घातक प्रकार आहे, असेही ते म्हणाले.

अहमदनगर शहरातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, 'नगर जिल्ह्यामध्ये महिन्याला जवळपास दीडशे केस अशा प्रकारच्या आढळून येतात, आणि हा समाजाला एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आई-वडिलांचा मुलांवर- मुलींवर आणि मुला-मुलींचा आई-वडिलांचा विश्वास कमी होत जाईल, व  हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. या दृष्टिकोनातून काहीतरी आळा या सगळ्या प्रकरणांमध्ये बसायला हवा. त्यातही लव्ह जिहाद हा एक घातक प्रकार आहे. त्यामुळे पलायन करून विवाह करण्यावर निर्बंध आणण्यासाठी एखाद्या कायदा यावा, अशी सगळ्यांची मागणी आहे,' असेही विखे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने