Agriculture:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1000 कोटी रुपये वितरित ; प्रोत्साहन अनुदानाचा 7.5 लाख शेतकऱ्यांना फायदा



ब्युरो टीम: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने 1000 कोटी रुपये मंगळवारी वितरित केले असून या योजनेसाठी पात्र असणाऱ्या तब्बल साडेसात लाख शेतकऱ्यांना अदयाप पर्यंत मदत मिळालेली होती. अशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

यामध्ये जर आपण बँके निहाय विचार केला तर साडेचार लाख जिल्हा बँकेचे खातेदार असून राष्ट्रीयकृत बँकेचे सुमारे तीन लाख कर्जदार अजूनही या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. आपल्याला माहित आहेच की, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली आहे

अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्यात येते. परंतु अद्यापपर्यंत राज्य सरकारने हे अनुदान थकवले होते. या अनुदानासाठी राज्यातील तब्बल 23 लाख 50 हजार शेतकरी पात्र असून अद्याप चार लाख 50 हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसून त्यासाठी 1000 कोटींची आवश्यकता होती व हे अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी देखील करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून तब्बल 1000 कोटी रुपये वितरित केल्यामुळे पात्र ठरलेल्या सुमारे  साडेसात लाख शेतकऱ्यांना याबाबतीत दिलासा मिळाला असून लवकरच प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

     या अनुदानाचा तिसरा टप्पा मिळेल मार्चअखेर

याबाबत शासनाच्या नियम पाहिला तर ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण होईल त्याच दिवशी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होती. परंतु आधार जोडून देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पर्यंत जमा झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारत होते.

याच पार्श्वभूमीवर 6 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्य सचिवांनी राज्याचे सहकार सचिव व वित्तसचिव यांना ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे अशा दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या अनुदान तात्काळ जमा करण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच तिसऱ्या यादीतील अनुदानाची फाईल वित्त विभागाकडे  असून फेब्रुवारी अखेरपर्यंत त्या फाईलची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल व पुरवणी मागणीच्या माध्यमातून मार्च महिन्याच्या शेवटी सर्व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून तरी दोन महिन्याभर या अनुदानाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने