Ajit Pawar Taunt Mns : मनसेचा आमदार फुटला तर... अजित पवारांची जोरदार फटकेबाजी



ब्युरो टीम : महाराष्ट्राचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतंय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं. यावेळी  निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भातल्या दिलेल्या निकालावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करतानाच त्यांच्या खास शैलीत मनसेला टोला लगावला.

'एखाद्या पक्षाचे एक किंवा दोनच लोकप्रतिनिधी असतील आणि त्यांनीच वेगळी भूमिका घेतली. तर मग पक्षचिन्ह आणि पक्ष त्याला देणार आहात काय? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवार  म्हणाले,'मनसेचा आमदार फुटला तर पक्ष आणि रेल्वेइंजिन त्याला देणार का?'

काय म्हणाले अजित पवार?

'निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय हा खरोखरीच पक्षपाती असल्याची जनभाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आयोगाने निर्णय देणं योग्य ठरलं असतं. निवडणूक आयोगाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण चाळीस आमदार आणि काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले म्हणून त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं. मग एखाद्या पक्षाकडे एक किंवा दोन आमदार असतील आणि त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला, उदा. मनसेकडे सध्या एकच आमदार आहे, त्याने जर वेगळा निर्णय घेतला तर मग पक्ष आणि रेल्वेइंजिन त्याला देणार का? असा सवाल अजित पवार यांनी हसत हसत विचारला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने