Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीचा सस्पेंस वाढला, फडणवीस म्हणाले...



ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण शपथविधी घेतला होता, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. शिवाय पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार बोलले, तर मी आणखी गौप्यस्फोट करेन, असंही फडणवीस म्हणाले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत आणखी गूढ वाढलं आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. या शपथविधीबाबत अनेक गूढ अद्याप कायम आहेत. याबाबत विचारलं असता अजित पवार उत्तर देणं टाळत आहेत. या सर्व घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'मुळात अजित पवारांनी केलेलं बंड होतं का? येथूनच सुरुवात होते. अजित पवारांनीही तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी बऱ्याच गोष्टी ‘नो कमेंट्स’ केल्या आहेत. काही काळाकरता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीही पाळायला पाहिजेत, त्यामुळे काही कमेंट त्यांना करू द्या, त्यानंतर उर्वरित कमेंट्स मी देईन,' असंही फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने