Ajit Pawar : अजितदादा म्हणाले, गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय...

'आताच्या काळात सर्वांना एकजूट दाखवण्याशिवाय पर्याय नाही. आपल्यामध्ये मतांची विभागणी होता कामा नये. एक-एक मत महत्त्वाचं आहे,' असेही ते म्हणाले.


ब्युरो टीम : 'गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, म्हणून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे,' असे वक्तव्य करतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक २०२३ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना पवार बोलत होते. पवार यांनी ट्विट करत स्वतःही माहिती दिली आहे.

'आताच्या काळात सर्वांना एकजूट दाखवण्याशिवाय पर्याय नाही. आपल्यामध्ये मतांची विभागणी होता कामा नये. एक-एक मत महत्त्वाचं आहे,' असेही ते म्हणाले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने