ब्युरो टीम: देशात सगळी
कडे द्वेषाचे राजकारण सुरु आहे. मोदी व शहा हे द्वेषाने राजकारण करतात. हे आता आमच्याही
मागे लागले आहेत. पण असे किती आले किती गेले नाद करा पण आमचा कुठ असे म्हणत वंचित
बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश
आंबेडकर यांनी यांनी अमित शहाना इशारा
दिला आहे.
राजगाव येथील धम्म
परिषदेत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात निवडणुकीत थोडी दयामाया दाखवली जात होती. मात्र भाजप सरकार लोकांना विकत घेण्याची भाषा वापरते. हे सरकार
व्यापाऱयांचे, दलालांचे आहे.
मोदी-शहा खुनशी हव्यासापोटी दबावतंत्र वापरून विरोधकांना संपवत आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
एकनाथ शिंदे आणि भाजपवाले
पैशांच्या जोरावर मतदारांना विकत घेण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे मतदारांनी
प्रत्येक ग्रामपंचायतीत ठराव घेऊन भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 'एका मताला पन्नास हजार रुपये द्या, नाही तर चालते व्हा' असा बोर्ड लावावा, असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला.
मुख्यमंत्री पद गेल्याने
देवेंद्र फडणवीस संतापले आहेत. त्यांच्या सभेत मुख्यमंत्री कोण अशा घोषणा द्या मग
पहा काय होते असा टोला त्यांनी फडणवीसाना लगावला.
टिप्पणी पोस्ट करा