ब्युरो टीम : नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीवर अनेक भाविकांचे मोठी श्रद्धा आहे. नवसाला पावणारा श्री गणेश म्हणून राज्यभर ख्याती आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात. आपलीही या श्री विशाल गणेशावर मोठी श्रद्धा असल्याने नगरमध्ये असताना आपण नियमित या ठिकाणी दर्शनाला येत. आताही जेव्हा नगरला येतो, तेव्हा आपण श्री विशाल गणेशाचे दर्शन घेत असतो. या ठिकाणी आल्याने मोठे आत्मिक समाधान लाभते. मंदिराचा झालेला सुबक व कलाकुसरीने जिर्णोद्धार हा नेत्रदिपक असाच आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे नगरमध्ये आले असता, त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास भेट दिली असता त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा.माणिकराव विधाते, नितीन पुंड आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पांडूरंग नन्नवरे यांनी श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी राबविण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी देवस्थानच्यावतीने कवडे यांचा सत्कार करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा