Ashok chavhan : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गौप्यस्फ़ोट पण अशोक चव्हानांना शरद पवारांवर विश्वास म्हणाले.....

 


ब्युरो टीम :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या पहाटेच्या शपथविधीवर आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला. राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचं सरकार आलं होतं. तेव्हापासून पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा वारंवार चर्चेला कारण ठरत आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती. तसेच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच सरकार स्थापनेचा प्रयत्न झाला होता, असा दावा फडणवीसांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण  यांनी भूमिका मांडली.

“देवेंद्र फडणवीस यांना हा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो? हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे. शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. ते खूप मुरब्बी नेते आहेत. ते असं कधीही करणार नाहीत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“शरद पवार यांची आजवरची कारकीर्द राहिलेली आहे. ते जी भूमिका घेतात ते खुलेआम घेतात. त्यांचा लपूनछपून राजकारण करण्याचा स्वभाव नाही”, असंदेखील ते म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान हे निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे. त्यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य चुकीचं आहे”, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली.

“पुण्यातील पोटनिवडणुकीच्या जागा या महाविकास आघाडीची निवडून येणार आहे. मग ते कसबा असो किंवा चिंचवड, प्रचाराला वेग आहे’, असं ते म्हणाले.

“भाजपला अशा प्रकारची रणनीती आखण्याचा दुर्दैवी प्रकार करण्याची वेळ येत आहे. यावर अजित पवार अधिक बोलू शकतील”, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने