ब्युरो टीम : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गावागावात विकास कामे झाली की नाहीत?, याची माहिती घेण्यासाठी समाधान यात्रा काढली आहे. समाधान यात्रेदरम्यान बिहार मधील औरंगाबादला मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर खुर्ची फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेत सुदैवाने नितीशकुमार यांना दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही नितीशकुमार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
समाधान यात्रेला औरंगाबादला गेलेल्या नितीशकुमार यांच्यावर खुर्ची फेकण्यात आली. खुर्चीचा पाठीचा तुकड्या त्यांच्यावर अत्यंत जवळून भिरकवण्यात आला. कांचनपूर, बरुण येथे मुख्यमंत्र्यांसमोरून हा तुकडा गेला. ते बरुण ब्लॉकच्या कांचनपूर गावात गेले, तिथे त्यांच्यावर खुर्ची फेकण्यात आली. कांचनपूर येथील पंचायत शासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. उद्घाटनादरम्यान कोणीतरी खुर्ची फेकली.
टिप्पणी पोस्ट करा