AUSW vs SAW Final : टी-२० चा किंग ऑस्ट्रेलियाच, दक्षिण आफ्रिकेचा झाला पराभव



ब्युरो टीम : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेतील फायनल  सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेवर १९ धावांनी विजय मिळला. या विजयासोबत ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यादा महिला टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर हा सामना खेळला गेला.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला १५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १३७ धावा करु शकला. त्यामुळे त्यांचे पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने