२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता राम जन्मभूमि परिसराच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या मनोज कुमारला एका फोन कॉलवरुन राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. अयोध्या पोलिसांनी तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती मिळाली. या व्यक्तीने राम जन्मभूमि मंदिर उडवून देण्याची धमकी का दिली? याबद्दलचा खुलासा करताना आरोपीने त्याच्या गर्लफ्रेण्डच्या भावाला अडकवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचं सांगितलं.
अयोध्या पोलिसांना तपासात आढळले की, आरोपीने आपल्या गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्यासाठी त्याच्या मोबाइल नंबरवरून नेट कॉलिंग करून राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. अयोध्येचे सर्कल ऑफिसर (CO) एस के गौतम यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्याकडे ज्या क्रमांकावरून फोन आला सर्व्हिलांसच्या मदतीने त्याची चौकशी करण्यात आली. त्यात अनिल रामदास घोडके उर्फ बाबा जान मूसा नामक व्यक्तीने दिल्लीच्या बिलालला फसवण्याच्या हेतूने नेट कॉलिंग करून त्याच्या नावाने धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने अनिल रामदास घोडके व त्याची पत्नी जार्ड संतन शाणी एश्वेरा उर्फ आयरन सॅटर्न हेल यांना अहमदनगर जवळील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भागातून अटक केली. आरोपी सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत होते. स्वतःला कधी चेन्नई तर कधी महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याची बतावणी करत होते.
टिप्पणी पोस्ट करा