Benefits of Banana : केळ एक, महिलांना होतील फायदे अनेक



ब्युरो टीम : नियमित केळी खाल्याने अनेक आजार तुम्ही टाळू शकतात. ज्या महिला तणाव आणि शारीरिक कमजोरीने त्रस्त आहेत, त्यांनी केळीचे सेवन नक्कीच केले पाहिजे. आहार तज्ज्ञ म्हणतात की, ‘केळीचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढते.’

केळी पोषक तत्वांचा खजिना  आहे. यामध्ये थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, बी, बी 6, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे घटक असतात. निरोगी शरीरासाठी हे सर्व घटक अत्यंत महत्वाचे मानले जातात. चला तर, महिलांसाठी केळी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात, ते जाणून घेउ...

1. महिलांच्या पोटात बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून केळी आराम देते. दररोज रात्री झोपताना इसबगोल भुसी किंवा दुधासह केळी खावी. त्यामुळे पोटातील गॅसच्या तसेच  बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळेल.

2. केळीच्या सेवनामुळे नैराश्याच्या समस्येतून आराम मिळतो, हे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. केळीमध्ये अशी काही प्रथिने आढळतात ज्यामुळे नैराश्याच्या समस्येने ग्रासलेला रुग्णाला आराम वाटतो. त्यामुळेच जेव्हा नैराश्याच्या समस्येने त्रस्त असणारी व्यक्ती केळीचे सेवन करतो, तेव्हा त्याला आराम मिळतो.

3. केळीत आढळणारे व्हिटॅमिन बी 6 शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य ठेवते.

4. केळी एक पूर्ण अन्न आहे, जे झटपट ऊर्जा बूस्टर म्हणून काम करते. यामध्ये ग्लुकोजची उच्च पातळी असते, जी ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. त्यामुळे जर महिलांनी रोज सकाळी एक केळी खाल्ली तर त्यांना दिवसभर ऊर्जा मिळेल आणि आवश्यक पोषक तत्त्वे देखील मिळतील.

दरम्यान, केळी  हे अनेकांना आवडणारं एक फळ. हे फळ बाराही महिने बाजारात उपलब्ध असते. केळी हे शक्तीवर्धक फळ आहे, पण त्याचबरोबर त्याचे अनेक फायदेही आहेत. दररोज एक केळी खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. दररोज एक केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. महिलांच्या आरोग्यासाठीही केळी  खूप फायदेशीर ठरतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने