काल एका वाहिनाला मुलाखत देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला. यावेळी 2019मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं काही तासांचं सरकार बनलं होतं. त्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती. त्यांच्याच संमतीने सगळं घडलं, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय.
यानंतर भाजपा प्रदेशचे अधिकृत ट्विटर अकौंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला @BJP4Maharashtra ने मा. @PawarSpeaks यांना टॅग करत लिहले "साहेब, खर तर, 'सत्य - असत्य' बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. पवार साहेब, तुम्ही राजकारणात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमीच खोट्याचा आधार घेत इथपर्यंत आलात. तुमचा इतिहास हेच सांगत आहे की, "तुम्ही सहकाऱ्यांचा विश्वासघात करूनच स्वतःला सिद्ध केलात."
याला कोट करत @NCPspeaks ने उत्तर दिले आहे "पवार साहेबांच्या उत्तुंग कर्तृत्वाला तुमच्या पोचपावतीची गरज नाही. ज्यांच्या जीवावर तुम्ही सरपंच पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या निवडणुका लढत आहात ते तुमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांना जाहीर व्यासपीठावरून आपला गुरु म्हणतात आणि मानतात, याचा विसर पडला असेल तर रोज सकाळी बदाम खा."
परंतु भाजपा प्रदेशचे अधिकृत ट्विटर अकौंटवरून परत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला असुन त्यांनी लिहिले आहे "एवढया उत्तुंग कर्तुत्वाला राज्यात आमदारांची साठी (60) का बरं ओलांडता नाही आली ? एवढ उत्तुंग नेतृत्व होते तर, कायमस्वरूपी 'भावी' बिरुदे लावून पंतप्रधान पदी बसण्याची वेळ का आली? माध्यमातून चालवलेल्या नरेटीव्ह मधून शरद पवारांचे कर्तृत्व उत्तुंग असेल, जमिनीवर नाही."
यावर देखील @NCPspeaks ने उत्तर दिले आहे त्यांनी लिहले आहे "पायाखालची जमीन सरकू लागली की सगळ्यांनाच पवार साहेब आठवतात. देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणवणार्यांना पोटनिवडणुकीत समोर पराभव दिसू लागलाय म्हणून पवार साहेबांचीच आठवण व्हायला लागली आहे. पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाहीत हे तुमच्या तथाकथित नेतृत्वाला माहीत आहे."
हे @BJP4Maharashtra आणि @NCPspeaks मधील ट्विटर वॉर सध्या सोशल मिडिया वर चर्चेचा विषय बनले आहे, आता @NCPspeaks ला @BJP4Maharashtra काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा