ब्युरो टीम: भाजपने पुढील
वर्षी होणाऱ्या लोकसभा २०२४ ची तयारी आतापासूनच युद्धपातळीवर सुरु केली असून पक्ष
कायम निवडणुकीच्या आवेशात असतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप सोशल मिडियाला
व्यासपीठ म्हणून वापरण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेपासून
विधानसभेपर्यंतच्या सर्व विद्यमान उमेदवार सोशल मिडीयावर किती सक्रीय आहेत यावर
त्यांची पुढील उमेदवारी ठरणार आहे. असे सांगितले जात आहे. या दृष्टीने भाजपने
सरपंचापासून आमदारापर्यंत सोशल मीडिया सर्वे सुरू केले आहे.
नागपूर मध्ये येणाऱ्या
विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल
मीडियातील फॉलोअर्सच्या शक्तीचा विचार केला जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यात
सरपंचांपासून आमदारांपर्यंत सर्वांना तिकीट वाटपात २५ हजार फॉलोअर्सचा फंडा लागू
होणार आहे.
या सर्वेनुसार विद्यमान
१३ टक्के आमदार सोशल मीडियावर पूर्णपणे निष्क्रिय आहेत, तर ९७ टक्के आमदारांचे फाॅलोअर्स २५
हजारांपेक्षा कमी असल्याने त्यांचे तिकीट धोक्यात असून त्यापैकी 50 टक्के
आमदारांना तिकीट मिळविण्यासाठी 3 महिन्यात सोशल मिडिया फाॅलोअर्स वाढविण्याचे
उदिष्ट देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. पक्षाच्या आमदार-खासदारांचे
रिपोर्ट कार्ड केले असून त्यामध्ये राज्यातील १०४ आमदार, २५ खासदारांबरोबर सुमारे २ हजार ८००
लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. १०४ पैकी १३ टक्के आमदार सोशल मीडियावर पूर्ण
निष्क्रिय, तर ९७ टक्के आमदारांचे
फॉलोअर्स २५ हजारांच्या घरामध्ये असणार आहे.
यापैकी ७० टक्के खासदार
सोशल मीडियावर सक्रिय असणार आहेत, तर २५
हजारांपेक्षा कमी फाॅलोअर्स असलेल्या आमदारांमध्ये ग्रामीण भागात जास्त प्रमाणात
आमदार आहेत. त्यांची ग्रामीण भागातील लोकांशी नाळ असली तरी सोशल मीडियाच्या विषयी
ते किती प्रमाणात मागे आहेत. यावर काम काम करण्याचे सांगण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा