ब्युरो टीम : 'देशात सध्या सर्वत्र महिला सक्षमीकरणाचे वारे वाहत आहेत, सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरिने प्रयत्न सुरू असून जो पर्यंत आपण एकत्र येऊन एकमेकीस सहकार्य करणार नाही, तोपर्यंत आपला सर्वांगीण विकास होणार नाही, त्याकरिता सर्व महिलांनी एकत्र यावे,' असे आवाहन माजी जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
अहमदनगर येथे साईज्योति स्वयंसहाय्यता यात्रा ,कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ मांडियेला या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे संचलन सिनेअभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी केले या कार्यक्रमात बोलतांना शालिनीताई म्हणाल्या की, 'घराचा कणा जशी घरातील कर्ती महिला असते, तशी ती आता समाजकारणात,राजकारणात, प्रशासकीय सेवेत,आरोग्य सेवेत देखील महत्वाची असणे गरजे आहे. देशात महिला सशक्तिकरण आणि सक्षमीकरण प्रक्रिया जोरात सुरू असून आपण महिलांनी देखील एक पाऊल पुढे टाकून एकमेकीच्या सहकार्यातून आपला स्वतःचा विकास साधला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण सक्षम होऊत. अन्यथा एकमेकीचे उणेदूणे काढू लागलो, तर ते शक्य होणार नाही.' यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप,कृषी उपसंचालक रवींद्र माने,आत्माचे उपसंचालक राजाराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा