Eknath shinde : जनतेशी संवाद साधण्यासाठी जनतेत जावे लागते, शिंदे थेटच बोलले



ब्युरो टीम :देशाच्या विकासाचे इंजिन महाराष्ट्र आहे. डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्य वेगाने प्रगती करत आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. राज्यात अनेक प्रकल्प नव्याने सुरू केले आहेत. केंद्र सरकारसोबत हातात हात घालून काम करत आहोत. केंद्र सरकारसोबत योग्य पद्धतीने संवाद साधल्यानंतर ते राज्यांना मदत करतात. त्यासाठी घरातून बाहेर पडले पाहिजे. घरातून फेसबुकवरून संवाद साधून विकास होत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

दरम्यान, २०१९ साली शिवसेना-भाजप युती म्हणून आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून मते दिली. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत स्वार्थी आणि लालची भावनेने युती तोडून सरकार स्थापन केले. २०१९ ला झालेली चूक सुधारायची होती. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. मला मुख्यमंत्री देखील व्हायचे नव्हते. परंतु, २०१९ ची चूक सुधारण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि मी मुख्यमंत्री झालो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने