कसब्यात हेमंत रासनेना तर चिंचवड मधून अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर

ब्युरो टीम:  भारतीय जनता पार्टीने कसबा व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कसब्यातून हेमंत रासने  तर चिंचवड मधून  स्वर्गीय आ. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

         कसबा मतदारसंघात टिळक कुटुंबियांना डावलून श्रीमंत दगडूशेठ गणपती चे विश्वस्त हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवड मध्ये जगताप कुटुंबियांच्या घरात उमेदवारी देण्यात आली  आहे. 



     महाविकास आघाडी आज उमेदवार घोषित करणार आहे. कॉंग्रेस कसबा तर राष्ट्रवादी चिंचवड पोटनिवडणूक लढवणार आहे. ठाकरे गटाला माघार घ्यावी लागणार आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने