मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना मोठ्या प्रमाणात पदं मिळतील- मंत्री गिरीश महाजन

 



ब्युरो टीम :राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. पण अजून अधिकृत माहिती नाही. अशातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांचं विधान चर्चेत आलं आहे.

राज्याचा पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. पण या विस्तारात महिलांना स्थान देण्यात आलेलं नाही. आता दुसऱ्या टप्प्यातल्या विस्तारात महिलांना स्थान मिळणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार होईल, पक्षश्रेष्ठी लवकरच घोषणा करतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मंत्रिमंडळात महिला नाहीत म्हणून त्यांचा आवाज दाबला गेला, असं म्हणणं चुकीचं आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना मोठ्या प्रमाणात पदं मिळतील. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना योग्य स्थान मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने