‘गेब्ब्स’ उभारणार सीएसआर निधीद्वारे ‘मॉडेल गाव’:सामाजिक बांधिलकी जोपाण्यासाठी घेतली ‘वाय फोर डी’ ची मदत




पुणे(१० फेब्रुवारी): भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर समाज व्यवस्थेत अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत. यातील सामाजिक सुधारणेचे श्रेय इथल्या सामाजिक संघटनाचे आहे. आज-काल त्यांची जागा सामाजिक संस्थांनी घेतली असून त्यांना मदत करण्यसाठी अनेक कपन्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. देशात जिथे सरकारी यंत्रणा पोहचत नाही तिथे या सामाजिक संस्था लोकांना सेवा देत असतात. सह्याद्री पर्वत रांगेतील कोकण, ठाणे, पुण्यातील अतिवृष्टी होणाऱ्या भागातील शेतकऱ्यांची परीस्थिती लक्षात घेऊन ‘गेब्ब्स हेल्थकेअर सोल्युशन्स’ या कंपनीने आपली सामाजिक भूमिका बजावत ‘वाय 4 डी फौंडेशन’ या सामाजिक संस्थेला सोबत घेत ‘पर्यावरण जतन आणि संवर्धन प्रकल्प’ हाती घेतला असून त्यासाठी पुण्यातील वेल्हे तालुक्यातील बालवड गावाला ‘मॉडेल गाव’ म्हणून विकसित करणार आहेत.  

    आज भारतात पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, पाणी, जमीन, जंगल, विस्थापन, भ्रष्टाचार यासह स्त्री-मुक्ती, जातीअंत, कामगारांचे शोषण अशा अनेक प्रश्‍नावर अनेक सामजिक संस्था स्वतंत्रपणे काम करताना आपल्याला दिसतात. कधी कधी एखाद्या विशिष्ठ मुद्द्यावर त्या एकत्रितपणेही लढतात. भारताचे सामाजिक ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकारी मदत किंवा परदेशी निधी घेण्याचे ज्ञान सामाजिक संस्थाना असल्याने त्याचा फायदा सामान्य भारतीया पर्यंत व्यवस्थित पोहचत आहे. सामाजिक संस्था सुरु केलेले प्रकल्प हे पूर्णत्वास जी पर्यंत पाठपुरावा करत असते. त्याचे पालन करत असलेल्या ‘वाय फोर डी’ संस्थेला ‘गेब्ब्स हेल्थकेअर सोल्युशन’ सारख्या नामांकित कंपनीने आपल्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून निधी उपलब्ध करून देत त्या माध्यमातून बालवड गावात एक विकासाचे मॉडेल उभे राहणार आहे. यातून शेतकऱ्यांचे व कंपन्यांचे संबध सुधारणार आहे. 

सह्याद्री पर्वत रांगेतील गावामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडून देखील त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. पावसाचे पाणी उताराने वाहून जाते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वर्षभरात फक्त भाताचे पिक घेता येते. बाकीचे महिने त्यांच्या हाताला कामं शिल्लक राहत नाही म्हणून गेब्ब्स ने हा मुद्द हेरून याभागातील शेतकऱ्यांच्या हाताला वर्षभर कामाची सोय करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी ‘पर्यावरण जतन आणि संवर्धन’ कार्यक्रम हाती घेण्यात आला असून गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या शेतकरी दिनानिमित्त वाय फोर डी ने बालवड गावात कृषी मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. या सत्र तालुका कृषी अधिकारी उमेश शिंदे यांनी शेतकऱ्यांना शेती विषयक योजनाची माहिती देऊन त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायला हवे शेतकर्यांना समजावून सांगितले. गावातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या उद्देश्याने बालवड गावात उताराच्या शेतीचे टप्पे करून बांधबंदिस्ती करून पावसाचे पाणी अडवण्यात येणार आहे. गावातील काही ठिकाणी शेततळे तयार करून वर्षभरासाठी त्यावर शेती कशी करावी याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण करत शेतांना बांध घालण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शेतकरी आपल्या शेतात फळ लागवड करण्यास इच्छुक असतात म्हणून सुरुवातीला पुणे जिल्ह्यात १००० तर ठाणे जिल्ह्यात १५०० फळ झाडे लावण्याचे नियोजन करण्यात्त आले असून अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. फळ झाडांची लागवड  मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते. मात्र किरकोळ पैशाच्या मोहापायी त्याची तोड होते. असे वृक्ष जाळून कोळसा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याचे महत्व संबधिताला जमीन मालकाला पटवून देण्याचे अनोखे कार्य संस्थेमार्फत सह्याद्री पर्वत रांगेतील कोकण ठाणे पुणे भागात केले जात आहे. त्यातून जैव विविधता संरक्षणाचे काम ‘गेब्ब्स’ ने ‘वाय फोर डी’ च्या हाती घेतले आहे.  यासाठी सहाय्यक संचालक अरुण घोलप व प्रकल्प अधिकारी श्याम भोजने हे कष्ट घेत आहेत.

-अनिरुद्ध तिडके



 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने