कसबा काँग्रेसला तर चिंचवड राष्ट्रवादीला? पोटनिवडणुकीसाठी 'या' उमेदवारांची नावे निश्चित?



ब्युरो टीम : कसबा व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सूर असून महाविकास आघाडीत कसबा कॉग्रेस तर चिंचवड राष्ट्रवादीच्या वाटयाला आला आहे. महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्याचे  निश्चित केले आहे. 

       कसबा व चिंचवड विधानसभेच्या  पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अनुक्रमे हेमंत रासने व अश्विनी लक्ष्मन जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  मतदारसंघातून कॉंग्रेस कडून रवींद्र धंगेकर तर चिंचवड मतदार संघातून राहुल कलाटे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निशिचीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,.  थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने