अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा राज्यशासनचा निर्णय जाहीर







ब्युरो टीम:  राज्यातील  शिंदे- फडणवीस  सरकारने  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला  २५ कोटींचा निधी जमा करण्याचे आदेश काढण्यात आला आहे. यामुळे राज्यातील महामंडळातील विविध योजनांचे लाभार्थी असणाऱ्या हजारो युवकांना याचा लाभ होणार आहे. 


अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. 


राज्यातील सर्व समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून योजना राबवण्यात येतात. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसाय, विपणन प्रक्रिया,उद्योग, पुरवठा व साठवणूकीसह लघू उद्योग, वाहतूक, अन्य व्यावसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांनी आज जीआर काढुण तात्काळ आदेश दिले .याचा लाभ राज्यातील हजारो युवकांना होणार आहे तरी जास्तीत जास्त युवकांना योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनमहा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी  केले आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने