महिलांना मंदिरात पुजाऱ्याचा अधिकार द्या - विधानपरिषदेच्या उपसभापती

 




ब्युरो टीम : शनी शिंगणापूर येथे जसे महिलांना चौथाऱ्यावर जाऊन पुजा करण्याचा मान मिळतो त्याच प्रमाणे इतर मंदिरा पुजाऱ्यांसोबत महिला  पुजाऱ्यांनाही पुजा करण्याचा मान मिळावा असे विधान करत राज्य सरकार 8मार्चला महिला दिनी नवीन महिला धोरण अमलात आणणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीनीं अभ्यास करून मसुदा सरकारकडे दिला पाहिजे असे विधान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना केले.

उपसभापती  निकम गोऱ्हे  म्हणाल्या की, आज महिला सगळ्या बाबतीमध्ये आघाडीवर आहेत. महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे असे आपण म्हणतो .श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे सुद्धा आता चौथ्यावर जाऊन महिलांना पूजा करण्याचा मान मिळतो. त्याच पद्धतीने तुळजापूर व कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा जे कोणी महिला पुजारी असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी महिला पुजारी म्हणून त्यांना त्या ठिकाणी मान मिळाला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. जर इतर मंदिरांमध्ये अशा प्रकारचा मान मिळत असेल पंढरपूर या ठिकाणी सुद्धा महिला पुजारी नियुक्त केलेल्या आहे, तर स्थानिक पातळीवरच्या प्रशासनाने या संदर्भातील बाब लक्षात घेऊन ज्या कोणी महिला पुजारी पूजा करण्यास तयार असतील त्यांना ती करू दिली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

महिला धोरणाच्या संदर्भामध्ये या अगोदरच्या सरकारने सुद्धा त्या त्या वेळी धोरण आणले होते. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी महिला धोरण सुद्धा आणले होते .आत्तापर्यंत चार महिला धोरण आपण मांडलेले आहे .आता या सरकारने नव्याने धोरण आणण्याचा निर्णय घेतला असून आठ मार्च रोजी हे धोरण आणले जाणार आहे .त्यासाठी लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये अभ्यास करून महत्त्वाचे मुद्दे शासनाला सादर केली तर निश्चितपणे त्यावर चर्चा होऊ शकेल असेही त्या म्हणाल्या. मी सुद्धा या संदर्भामध्ये शासनाला काही बदल करण्याचे सुचवलेले आहेत तर काही मुद्दे नव्याने सुद्धा समाविष्ट करावे अशा प्रकारच्या लेखी सूचना केल्या असल्याचेही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले .लोकप्रतिनिधी धोरण मांडताना मागील धोरणातील विषय न घेता नव्याने काही विषय घेता येईल का याचा सुद्धा अभ्यास करून ते मांडावेत असे त्या म्हणाल्या. 

 महिलांनी नोकरी करताना आम्हाला आरक्षण वय मर्यादा ही वाढवून देण्यात यावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे. तसेच काही वृद्ध महिलांनी सुद्धा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याचे निराकरण करावे यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी केलेली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत धोरण तयार करताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा राष्ट्रीय महिला धोरणाचा विषय घेतलेला होता. त्याचा सुद्धा आधार घेत एकत्रितपणे यावर चर्चा करून नवीन धोरणामध्ये वेगवेगळे विषय समाविष्ट करावे तसेच जो महिलांसाठी शक्ती कायदा येत आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी करावी अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने