संगमनेरच्या सुसंस्कृत लोकनेत्याची प्रतिमा डागाळण्याचे कारस्थान नागरिकांची भावना

 

 

ब्युरो टीम :नाशिक पदवीधर मतदारसंघातील नाट्यमय घडामोडीनंतर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपल्याच पक्षाने आपल्याभोवती षडयंत्राचे जाळे विणल्याचा घणाघात केला होता. त्याचे वास्तव दर्शन आता हळूहळू होवू लागले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच आपल्या व्यक्तिगत महत्त्वकांक्षेसाठी संपूर्ण पक्षाला अडचणीत आणू पहात आहेत. त्यातूनच त्यांनी अवघ्या राज्यात सुसंस्कृत लोकनेता म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा डागाळण्याचे कारस्थान रचल्याचे दिसू लागले असून राज्यातील जनता हे कधीही सहन करणार नाही अशी भावना जनमानसातून समोर येत आहे.

      खुद्द थोरात यांनीही आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधताना आपण व्यथित झाल्याचे सांगून आज काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यामुळे राज्यासह अहमदनगरमधून संताप व्यक्त होवू लागला असून अडगळीत चाललेल्या काँग्रेसला राज्यात पुन्हा सन्मान मिळवून देणार्‍या लोकनेत्याचा आवाज ऐका आणि पक्ष संपवणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी समोर येवू लागली आहे.


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने