ब्युरो टीम :पहिल्या कसोटी सामान्याच्या पहिल्या दिवशी भारताने आर. अश्विनला नाइट वॉचमन म्हणून पाठवत एक मोठी खेळी केली आहे. कारण या गोष्टीचा चांगलाच फायदा आता भारताला दुसऱ्या दिवशी होऊ शकतो
कसोटीचा पहिला दिवस संपण्यासाठी एक षटक बाकी असताना आर. अश्विनला फलंदाजीसाठी मैदानात पाठवले. अखेरच्या षटकात भारताची मोठी विकेट पडू नये, म्हणून अश्विनला नाइट वॉटमन म्हणून पाठवण्यात आले असल्याचे म्हटले जात होते. पण आता या गोष्टीचा फायदा भारताला दुसऱ्या दिवशी होणार असल्याचे समोर येत आहे.
कसोटी सामन्याचा पहिला तास हा सर्वात महत्वाचा असतो. कारण पहिल्या तासात खेळपट्टीवर दव जास्त असते आणि त्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना होऊ शकतो. त्यामुळे भारताला विकेट वाचवणे महत्वाचे आहे. त्यासाठी पहिल्या तासात जर अश्विनने आपली विकेट वाचवली आणि पहिला तास खेळू काढला तर भारतासाठी ही गोष्ट महत्वाची ठरू शकते. कारण पहिला तास जर अश्विन खेळला तर त्यानंतर भारताचे जे फलंदाज येतील त्यांना खेळण्यासाठी चांगला पाया तयार झालेला असेल. त्यामुळे भारताने जी खेळी अश्विनला नाइट वॉचमन पाठवून केली आहे ती यशस्वी ठरू शकते
अश्विन हा एक चांगला फलंदाज आहे आणि ही गोष्ट सर्वांनीच पाहिली आहे. कारण अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये शतकंही झळकावली आहेत. त्यामुळे अश्विनची बॅट जर यावेळी चालली तर भारतासाठी तो बनस ठरेल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारताला जास्त चिंता करण्याची काळजी नसेल. पण जर अश्विन पहिल्या तासात बाद झाला तर मात्र भारताची चिंता वाढू शकते. दुसरीकडे रोहित या पहिल्या तासात कशी फलंदाजी करतो, हे पाहणे महत्वाचे असेल. कारण रोहित आपील विकेट पहिल्या तासाच वाचवतो का, हे पाहणे महत्वाचे असेल. त्यामुळे पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विन आणि रोहित हे पहिल्या तासात कशी फलंदाजी करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा पहिला तास महत्वाचा असेल.
टिप्पणी पोस्ट करा