ब्युरो टीम : अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या सिनेमाने आतापर्यंत एकूण 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती मिळाली होती. आता एवढं भरभरून यश मिळाल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने मोठी घोषणा केली आहे.
'वेड' या सिनेमाने आतापर्यंत एकूण ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता या सिनेमाच्या कमाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
30 डिसेंबर रोजी 'वेड' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने एकूण 70 कोटींचा आकडा पार केला. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला.
आता एवढं भरभरून यश मिळाल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीदरम्यान अत्यंत कमी दरात 'वेड' प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
महाराष्ट्रभरातील थिएटरमध्ये एकाच किमतीत हा सिनेमा दाखवण्यात येईल अशी माहिती रितेशने दिली आहे.
13 ते 16 फेब्रुवारीदरम्यान 'वेड' सिनेमा 99 रुपयांत महाराष्ट्रभरातील थिएटर्समध्ये दाखवण्यात येईल.
जिनिलिया आणि रितेशकडून हे खास 'व्हॅलेंटाइन स्पेशल गिफ्ट' असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रितेशच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
रितेशच्या चाहत्यांसाठी हे खास गिफ्ट आहे. कारण मराठीमध्ये हिट ठरलेला सिनेमा अवघ्या 99 रुपयात पाहता येईल.
टिप्पणी पोस्ट करा