थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, तांबेंना दिली खुली ऑफर

 ब्युरो टीम : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत त्यांनी तांबेंसह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे.

    बावनकुळे म्हणाले, स्थानिक पातळीवर सत्यजीत तांबेंना मदत करुन त्यांना विधानपरिषदेत भाजपनं मदत केली. त्यामुळं सत्यजीत तांबेंना आम्ही ऑफर दिलेली नाही, पण त्यांना जर वाटलं तर भाजपत त्यांना प्रवेश करायचा आहे. तर त्यांचं स्वागत आहे, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत.

    आम्ही आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो आणि पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवणं. पण सत्ता हे आमच्यासाठी साध्य नाही साधन आहे हा भाजपचा मूलमंत्र आहे. बाळासाहेब थोरातांना मी व्यक्तिगत ओळखतो. त्यांच्या रक्तात काँग्रेस असून त्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं, अशा वेळी नेतृत्वाला नाराजी येत असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने