खेलो इंडिया'त आर. माधवनच्या लेकानं वाढवली महाराष्ट्राची शान




ब्युरो टीम : : बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेता आर त्याच्या कामासोबतच त्याच्या स्वभावातील वेगळेपणामुळं चर्चेत असतो. माधवन त्याच्या लेकामुळंही अनेकदा चर्चेत येतो. त्याचं कारण म्हणजे अभिनय क्षेत्रात न येता त्याचा लेक वेदांत स्पोर्टमध्ये आपलं करिअर करतोय. माधवनचा मुलगा वेदांत हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. यापूर्वीही त्यानं अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केलीय. आता पुन्हा एखदा त्याची चर्चा होतेय. 'खेलो इंडिया' युथ गेममध्ये वेदांतनं पाच सुवर्ण पदकं, तसंच दोन रोप्य पदकांची कमाई केली आहे.

देशातील वेगवेगळ्या भागांतील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं खेलो इंडिया स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळं अनेक खेड्यातील खेळाडूंना व्यासपीठ, संधी मिळत असून अनेक खेळाडू पुढं येत आहेत. या स्पर्धेत आर. माधवनच्या लेकानं महाराष्ट्रासाठी तब्बल सात पदकं पटकावली आहेत. आर माधवन यानं या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं इतर स्पर्धकांचा उल्लेख करत त्यांचंही अभिनंदन केलं आहे.दोन ट्रॉफींसाठी महाराष्ट्र संघाचे अभिनंदन..

एक ट्रॉफी मुलांनी स्विमींगमध्ये तर दुसरी संपूर्ण खेलो गेम्समध्ये महाराष्ट्रासाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी. अपेक्षा फर्नांडीस (६ सुवर्ण आणि १ रौप्य) वेदांत माधवन (५ सुवर्ण आणि दोन रौप्य) यांच्या कामगिरीनं कृतज्ञ. असं माधवननं म्हटलं आहे. तर पुढं तो म्हणतो की,प्रदीप सरांचे अथक प्रयत्न आणि मध्य प्रदेश सरकार यांचे आभार. खूप आनंदी आणि अभिमान आहे, असं त्यानं म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने