ब्युरो टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंदीय गृह मंत्री अमित शहा यांचे पुण्या-
मुंबईचे दौरे वाढले आहेत. येत्या काळात पुणे-मुंबई सह महाराष्ट्रातील १४
महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. सोबतच पुण्यातील दोन मतदात संघात
पोटनिवडणुका होत आहेत. यामुळे मोदी-शहाचे दौरे वाढले का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच राष्ट्रवादीचे
अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी-शहानां राज्यातील
निवडणुका महत्वाच्या वाटत असाव्यात अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. ते पत्रकारांशी
संवाद साधत होते.
महापालिका निवडणुका येत
आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महत्त्वाच्या वाटत आहेत असं वाटतं.
त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा येत असल्याचं दिसतंय. हरकत नाही. त्यांनी यावं.
महाराष्ट्राला काही देणार असतील, महाराष्ट्राचं हित असेल तर विरोध करण्यास करण्याची
गरज नाही. पण येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विचार त्यांनी करावा, असा टोला शरद
पवार यांनी लगावला.
यावेळी त्यांनी अमित शाह
यांच्या पुणे दौऱ्यावरही टीका केली. देशाच्या गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीसाठी
पुण्यात दोन दोन दिवस घालवावे लागतात याचा अर्थ आमच्या कार्यकर्त्यांची कामे
चांगली सुरू आहेत, असा टोमणा पवार यांनी मारला.
टिप्पणी पोस्ट करा