bollywood: यंदा ‘द काश्मीर फाइल्स’ची दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बाजी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी



 ब्युरो टीम: यंदाच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स’ची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बाजी मारली. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीसाठी हा पुरस्कार सोहळा खूप खास ठरला. कारण आलियाला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर रणबीरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.अभिनेता वरुण धवनने क्रिटिक्स बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार पटकावला. तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या कांतारा या चित्रपटाचा अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘द काश्मीर फाइल्स’ने पटकावला. तर अनुपम खेर यांना ‘मोस्ट व्हर्सेटाइल अभिनेता’ हा पुरस्काराने गौरविण्यात आलं. मालिकांच्या विभागात रुपाली गांगुलीच्या ‘अनुपमा’ने बाजी मारली.

 

विजेत्यांची संपूर्ण यादी-

सर्वोत्कृष्ट चित्रपट- द काश्मीर फाइल्स

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आर. बाल्की (चुप: रेव्हेंज ऑफ द आर्टिस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र: पार्ट 1)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)

मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर- ऋषभ शेट्टी (कांतारा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- मनिष पॉल (जुग जुग जियो)

फिल्म इंडस्ट्रीतील अमूल्य योगदान- रेखा

सर्वोत्कृष्ट वेब सीरिज- रुद्र: द एज ऑफ डार्कनेस

क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता- वरुण धवन (भेडिया)

फिल्म ऑफ द इअर- RRR

टेलिव्हिजन सीरिज ऑफ द इअर- अनुपमा

सर्वांत व्हर्सेटाइल अभिनेता- अनुपम खेर (द काश्मीर फाइल्स)

टेलिव्हिजन सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता- झैन इमाम (फना: इश्क मे मरजांवा)

टेलिव्हिजन सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तेजस्वी प्रकाश (नागिन)

सर्वोत्कृष्ट गायक- साचेत टंडन (मैय्या मैनू)

सर्वोत्कृष्ट गायिका- निती मोहन (मेरी जान)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ- पीएस विनोज (विक्रम वेधा)

म्युझिक इंडस्ट्रीतील अमूल्य योगदान- हरिहरन

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने