Breaking News : मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक



ब्युरो टीम : दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणात अटक करण्यात आलीय.

गेल्या रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्पाच्या तयारीचा हवाला देत ते पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना २६ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ते आज सकाळी ११.१० वाजता सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. अखेर सीबीआयने ८ तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना अटक केली.

यामुळे दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता अटक झाल्यामुळे सिसोदिया उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात का?  याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने