Budget Session of the Legislature: आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; फडणवीस सादर करणार पहिल्यांदाच अर्थसंकल्प



ब्युरो टीम: आजपासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा आहे. शिंदे-ठाकरे गटात सुरू असलेला संघर्ष आणि राज्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-समाने येण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने