ब्युरो टीम : चांगला नफा मिळवता येईल, असा व्यवसाय सुरू करण्याचा तुम्ही विचार करीत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. घर बसल्याबसल्या हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. हा असा व्यवसाय आहे, जो वर्षभर चालतो आणि भरपूर नफा देखील देतो. तो व्यवसाय म्हणजे ‘कॉर्न फ्लेक्स’ बनवण्याचा. हा व्यवसाय करून तुम्ही एका दिवसात 4,000 रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला वेगळं प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिन्याला 1,20,000 रुपये सहज कमवू शकता. खरतर, मक्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. मका हा आरोग्यासाठीही खूप चांगला मानला जातो. सकाळच्या नाश्त्यात बहुतेक घरांमध्ये याचा वापर केला जातो. त्यामुळेच कॉर्न फ्लेक्सचा व्यवसाय करून तुम्हाला करोडपती होण्याची संधी आहे.
भांडवल किती लागेल?
तुम्ही हा व्यवसाय लहान प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात, असा कोणत्या स्तरावर सुरू करू इच्छिता, यावर या व्यवसायासाठी किती भांडवल लागेल, हे अवलंबून आहे. साधारणपणे सुरुवातीला तुम्हाला या व्यवसायासाठी किमान 5 ते 8 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.
लाखो रुपयांची कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्याची किंमत सुमारे 30 रुपये आहे, आणि बाजारात ते 70 रुपये किलो दरान सहज विकलं जातं. त्यामुळे जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकलं, तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. याचाच अर्थ एका महिन्याचा तुम्हाला या व्यवसायातून 1,20,000 रुपये उत्पन्न मिळेल.
योग्य जागेची निवड
तुम्ही हा व्यवसाय अशा भागात उभारावा जिथे मक्याचं उत्पादन जास्त आहे. कारण जर तुम्ही मक्याचं उत्पादन ज्या भागात जास्त आहे, त्या भागापासून दूर व्यवसाय उभारला तर मका आणून त्यापासून कॉर्न फ्लेक्स बनवणं खूप महाग पडेल. त्यामुळेच व्यवसायासाठी अशी जागा शोधली पाहिजे, जिथे चांगल्या प्रतीचा मका सहज मिळेल, किंवा तुम्ही स्वतः तिथे मका पिकवू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायात वापरल्या जाणार्या मशीनचा वापर केवळ मक्यापासून बनवलेलं ‘कॉर्न फ्लेक्स’ बनवण्यासाठी केला जात नाही, तर या मशीनचा वापर गहू आणि तांदळापासून फ्लेक्स तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
व्यवसायासाठी आवश्यक जागा
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला सर्वात प्रथम प्लांट उभारण्यासाठी जागा लागेल. यासाठी तुमच्याकडे एकूण 2000 ते 3000 चौरस फिट जागा असावी. याशिवाय व्यवसायासंबंधीत मालाची साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र जागा म्हणजेच गोडाउन आवश्यक आहे. एकंदरीत या व्यवसायासाठी मशीन, वीज सुविधा, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, प्लांट उभारण्यासाठी जागा आणि मालाची साठवणूक करण्यासाठी गोडाउन गरजेचं आहे.
टिप्पणी पोस्ट करा