by election; पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुक रयत स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क आणली चिल्लर



ब्युरो टीम: पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच सगळीकडे चर्चा आहे. काल (७ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी रविराज  काळे हेदेखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर आणली. याच कारणामुळे निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी रविराज  काळे यांनी अनामत रक्कम म्हणून १० हजारांची चिल्लर आणली होती. यामध्ये १ रुपया, २ रुपये, ५ रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. याच कारणामळे निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनामत रक्कम मोजताना चांगलीच कसरत करावी लागली.

अपक्ष अर्ज  दाखल करणारे रविराज काळे व त्यांचे सहकारी ऋषिकेश कानवडे स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून  पिंपरी चिंचवड भागात कायम काम करत आले आहे. 

शेवटी काही काळ सर्वच अधिकारी चिल्लर मोजत बसले आणि मोजणी पूर्ण केली. किमान अर्धा तास चिल्लर मोजण्याचे काम सुरू होते. तशी माहिती अपक्ष उमेदवार रविराज काळे यांनी दिली. आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नाना उर्फ विठ्ठल काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने