by election :वंचित बहुजन आघाडीने दिला महाविकास आघाडीला जोरदार धक्का? चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना पाठिंबा; तर कसब्यात..

 


ब्युरो टीम: पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. आधी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटासोबत युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. यानंतर परिपत्रक काढून वंचितने कलाटे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर अद्याप कसबा पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेतला नाही.

हाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही.

पिंपरी चिंचवड मध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी  1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने