ब्युरो टीम: ऐतिहासिक
आग्र्याच्या किल्ल्यावर येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. याला
केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली असून यासाठी आर आर पाटील
फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. महाराष्ट्रासाठी
आणि तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी ठरली आहे.
आग्र्याच्या लाल किल्ला
परिसरात शिवजयंती साजरी करणार असल्याचं महाराष्ट्रातील खासगी संस्थेनं जाहीर केलं
होतं. पण पुरातत्व विभागानं यावर आक्षेप घेतला होता. यानंतर या संस्थेनं दिल्ली
हायकोर्टात धाव घेतली होती.
यानंतर कोर्टानं यावर
निर्णय देताना जर राज्य सरकार या संस्थेसोबत सहआयोजक होण्यास तयार असेल तर हा
शिवजयंती सोहळा साजरा करण्यास हरकत नाही, असं म्हटलं होतं. यानंतर
महाराष्ट्र सरकार यासाठी सहआयोजक होण्यास तयार आहे. त्यामुळं लाल किल्ल्यावर
शिवजयंतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबद्दल महाराष्ट्र
सरकारने पुरातत्व खात्याला पत्र लिहिलं होतं. हायकोर्टाने घालून दिलेल्या
अटींप्रमाणे आपण या शिवजयंती कार्यक्रमाचे सहआयोजक होण्यास तयार आहोत, असं महाराष्ट्र
सरकारने म्हटलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा