congress : कॉंग्रेस मधील वाद काय थांबेना, प्रदेशाध्यक्ष पटोलेंच पद धोक्यात?

 


ब्युरो टीम: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं होतं. ते प्रकरण शांत होत नाही तोच काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.काँग्रेस नेत्यांकडून आता पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 21 नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेत नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काय आहे नेमकी मागणी काँग्रेसमधील अनेक नेते हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्या कामावर नाराज असल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 21 नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेतली आहे.

या नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव खान नायडू, प्रदेश काँग्रेसचे सदस्य प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यांच्यासह 21 जणांचा समावेश आहे. नाना पटोले यांना हटवून आदिवासी नेते शिवाजी मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी या नेत्यांनी रमेश चिन्निथाला यांंच्याकडे केली आहे. काय आहेत आरोपकाँग्रेसच्या 21 नेत्यांनी नाना पटोले यांना हटवण्याची मागणी करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांच्यामुळे पक्षात गटबाजीला सुरुवात झाली.

नाना पटोले यांची पक्षात मनमाणी सुरू आहे. काँग्रेसमध्ये नानागिरी सुरू करणार असं ते म्हणतात. ते कोणाचचं ऐकत नाहीत. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं आणि त्यांच्या जागी आदिवासी नेते शिवाजी मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करावं अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. या प्रकरणात आपण लवकरच काँग्रेस हायकमांडची देखील भेट घेणार असल्याचं या नेत्यांनी म्हटलं आहे.

 

-----------------------

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने