ब्युरो टीम: आज जाहीर
झालेल्या कसोटी संघाची क्रमवारी अपडेट होताच टीम इंडियाने यातही नंबर 1 स्थान
पटकावले आहे. रोहित हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या
नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 ठरला आहे.
सध्या टी-20 संघाचा
कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वनडे आणि कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे आहे.
वनडे आणि टी-20 क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ 111
रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अलीकडेच त्यांनी
दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. इंग्लंड 106 गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड 100
गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका 85 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
टीम इंडिया आयसीसी टेस्ट
रँकिंगमध्ये नंबर-1 टीम बनली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच
कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला.
टिप्पणी पोस्ट करा