Cricket :भारत - पाकिस्थान पुन्हा वाद आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या बैठकीत नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

 



ब्युरो टीम : आशिया चषक स्पर्धेच्या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. पाकिस्तान जोरदार आक्रमण करत होते. पण त्याचवेळी जय शहा यांनी पाकिस्तानचे हे आक्रमण कसे थोपवून लावले, याची माहिती आता समोर आली आहे.

       आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भारताचे जय शहा आणि पाकिस्तानचे नजम सेठी यांच्यात चांगलाच वाद झाला. 'आम्ही आशिया कप; तसेच चॅम्पियन्स करंडकचे यजमानपद सोडणार नाही,' असे सेठी यांनी शहा यांना ठामपणे सांगितले, असा दावा पाकिस्तान बोर्डाच्या सूत्रांनी केला आहे. सेठी यांनी बहामात झालेल्या या बैठकीस रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्यानंतरच पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेतल्याचा अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला. आशिया कप स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानात यायलाच हवे यासाठी सेठी आग्रही होते. सुरक्षेची पूर्ण ग्वाही दिल्यानंतरही भारतीय संघ का येत नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

        आशिया कप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघाला तेथील सरकार मंजूरी देणार नसेल, तर वर्ल्ड कपमध्ये आमचा संघही खेळणार नाही, असे सेठी यांनी शहा यांना सांगितले. शहा यांनी आशियाई; तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांची सांगड घालू नका, असे सांगितल्याचे समजते. त्यानंतरही सेठी आक्रमक झाल्यामुळेच आशियाई कप स्पर्धेच्या संयोजनाबाबत अंतिम निर्णय मार्चपर्यंत लांबणीवर गेल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने