ब्युरो टीम:भारतात क्रिकेट सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटचे अनेक चाहते असल्याने क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणात ग्लॅमर प्राप्त झाले आहे. अशातच भारतीय क्रिकेट विषयी धक्कादायक माहिती एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे. यातून भारतीय संघाशी संबंधित गोपनीय निवड प्रकरणांचा खुलासा करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या निवड
समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी मंगळवारी एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंग
ऑपरेशन दरम्यान अनेक खुलासे केले. यात शर्मा यांनी दावा केला की "देशातील अव्वल क्रिकेटपटू पूर्णपणे
तंदुरुस्त नसताना देखील फिटनेस सिद्ध करण्यासाठी इंजेक्शन घेतात". तसेच अनेक
खेळाडू हे 80 ते 85 टक्केच फिट असताना इंजक्शन्स घेऊन व्यावसायिक क्रिकेटमध्ये
लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.
खेळाडू फिट होण्यासाठी
नक्की कोणते इंजेक्शन घेता यावर उत्तर देताना शर्मा म्हणाले, 'हे पेन किलरचे
इंजेक्शन नक्कीच नाही. कारण पेन किलरचे इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता
असते. तसेच ते डोपिंगमध्ये देखील येऊ शकते. तेव्हा खेळाडू असे इंजेक्शन घेतात जे
त्यांना काही काळात फिट करते, आणि जे अँटी-डोपिंग अंतर्गत देखील येणार नाहीत'.
टिप्पणी पोस्ट करा