cricket: भारतचे हे चार खेळाडू २०२३च्य वन डे वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या तयारीत

 


ब्युरो टीम:



रवींद्र जडेजा - भारताच्या या मॅच विनर खेळाडूने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन केले. ३४ वर्षीय रवींद्र जडेजा वन डे क्रिकेटमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे आणि २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यानेही १७१ वन डे सामन्यांत २४४७ धावा आणि १८९ विकेट्स घेतल्या आहेत.

                                        

शिखर धवन - आयसीसी स्पर्धांमध्ये शिखर धवनने दमदार कामगिरी केली आहे. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात शिखरचा सिंहाचा वाटा होता आणि जर त्याला संधी मिळाली तर तो २०२३ चा वन डे वर्ल्ड कपही खेळू शकतो.

पण, ३७ वर्षीय शिखरचं वय पाहता आणि भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी युवा खेळाडूंची सज्ज असलेली फौज पाहता वन डे क्रिकेटमधून तो निवृत्ती घेऊ शकतो. त्याने १६७ वन डे क्रिकेटमध्ये ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आहेत आणि त्यात १७ शतकं व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.

                                               



विराट कोहली -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या विराट कोहली २०२३ च्या वन डे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेऊ शकतो. बीसीसीआयने ट्वेंटी-२० संघासाठी आता विराटचा विचार करणार नसल्याचे संकेत दिले आहेत आणि आता हा खेळाडू कसोटीवर लक्ष केंद्रीत करू शकतो. २००८मध्ये त्याच्या नेृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे आणि आता त्याला वन डे वर्ल्ड कप जिंकून सीनियर लेव्हलवरील आयसीसी स्पर्धा जिंकावी लागेल. विराटने २७१ वन डे सामन्यांत १२८०९ धावा केल्या आहेत. त्यात ४६ शतकं व ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट आता ३५ वर्षांचा आहे.

                        


रोहित शर्मा - २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माने धमाका उडवून दिला होता आणि वर्ल्ड कपच्या एका स्पर्धेत पाच शतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. आता २०२३ मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे. विराटप्रमाणे रोहितही वन डे वर्ल्ड कपनंतर केवळ कसोटीवर लक्ष केंद्रीत करू शकतो आणि तोही ३६ वर्षांचा होईल. रोहितने २४१ वन डे सामन्यांत ३० शतकं व ४८ अर्धशतकांसह ९७८२ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक नावावर असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने