Crime : धक्कादायक! गर्लफ्रेंडला मेसेज केल्याने मित्राचा गळा चिरला



ब्युरो टीम : एका २२ वर्षीय तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज केला आणि बोलला म्हणून दुसऱ्या मित्राचा गळा चिरला. हा तरूण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मृतदेहाचा प्रायव्हेट पार्ट कापला, त्याचं हृदयही बाहेर काढलं. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.नवीन असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी हरिहर कृष्ण या तरूणाला अटक केली आहे. 'एएनआय' ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हैदराबाद या ठिकाणी ही घटना घडली आहे. या आरोपीच्या गर्लफ्रेंडचे त्याच्या मित्राशी पूर्वसंबंध होते. त्यानंतर एक दिवस त्याने तिला मेसेज केला आणि तिच्याशी संवाद साधला म्हणून मित्राने मित्राची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली. पोलिसांनी पीडित तरूणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी तो सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. तसंच पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत यासंबंधीची कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, सध्या समोर येणाऱ्या हत्येच्या घटना या भयंकर आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रद्धा वालकर प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये लिव्ह इन पार्टनर आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने