Dengue Flu : डेंग्यूचा ताप कमी करायचा? 'हे' उपाय करा



ब्युरो टीम : डेंग्यू हा फ्लू सारखा आजार आहे, जो एडिस इजिप्ती प्रजातीचा मादी डासचावल्यामुळे होतो. उलट्या, तीव्र डोकेदुखी, मळमळ, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोळ्यांच्या मागे दुखणे आणि ग्रंथी सुजणे आदी डेंग्यूची काही सामान्य लक्षणेआहेत. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास थकवा येणे, उलट्यांमध्ये रक्त येणे, सतत उलट्या होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, अस्वस्थता आणि पोटात दुखणे अशा मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

डेंग्यूच्या तापामध्ये शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी होऊ लागते. पुरेसे प्लेटलेट्स नसल्यास, एखाद्या व्यक्तीला रक्तस्त्रावाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तस्त्राव ही डेंग्यूमुळे होणारी गंभीर समस्या आहे.  डेंग्यूवर विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. या आजाराची लक्षणे गंभीर होऊ नयेत, यासाठी उपचार करणे हाच सध्या तरी एकमेव उपचार आहे. सुदैवाने, काही प्रभावी घरगुती उपचार आहेत जे तुम्हाला डेंग्यू तापातून लवकर बरे होण्यास मदत करू शकतात.

डेंग्यू वर काय आहेत आयुर्वेदिक उपचार?

डेंग्यू तापातून आराम मिळवण्यासाठी भरपूर नारळ पाणी प्या. गरम पाण्यात तुळशीची पाने उकळून नंतर हे पाणी प्या. याशिवाय मेथीची पाने उकळून चहा बनवून पिणे सुद्धा डेंग्यूचा ताप कमी होण्यास फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया डेंग्यू ताप असताना अजून काय सेवन करणे फायदेशीर ठरेल.

पपईची पाने

डेंग्यू तापावर पपईची पाने एक उत्तम उपाय आहे. हे या लक्षणांपासून मुक्त होण्यास, प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि प्लेटलेट संख्या वाढविण्यास मदत करतात. या पानांचा रस काढून तो दिवसातून दोनदा  घेऊ शकता.

नारळ पाणी

डेंग्यूमुळे उलट्या होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेट वाटू शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करू शकता. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

कडूनिंबाची पाने

डेंग्यूच्या तापामध्ये कडूनिंबाच्या पानांचा अर्क पिणे फायदेशीर ठरतं. यामुळे रक्त प्लेटलेट्स तसंच पांढर्‍या रक्त पेशींमध्ये वाढ होते. कडूनिंबाच्या पानांचा रस रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकतो. तुम्ही कडूनिबांची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी पिऊ शकता.

मेथीची पाने

मेथीची पाने ताप तसंच वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात. डेंग्यू तापाची लक्षणं कमी करण्यासाठी मेथीची पाने हा महत्त्वाचा उपाय आहे. सध्या थंडीचे दिवस असून या दिवसात मेथीची पाने बाजारामध्ये सहज मिळू शकतात. ही पाने रात्रभर पाण्यात भिजून ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी पिता येईल.

संत्र्याचा रस

व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम करते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे संत्र्याच्या रसाचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने