Devakinadan maharaj: हिंदूंनी निदान 5-6 मुलं तरी जन्माला घालावीत; नागपुरात देवकीनंदन महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

 


ब्युरो टीम: देशात जोपर्यंत जनसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत प्रत्येक सनातनी हिंदुने पाच ते सहा मुले जन्माला घालावीत असं वादग्रस्त वक्तव्य अध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकूर महाजराज यांनी केलं असून या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ते नागपुरात बोलत होते. नेमकं काय म्हणाले देवकीनंदन ठाकूर देशात जोपर्यंत जनसंख्या नियंत्रण कायदा येत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनी हिंदूने पाच ते सहा मुले जन्माला घालावीत. असं वक्तव्य देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केलं आहे. स्वातंत्र्यानंतर सनातनी हिंदूंवर अन्याय झाला.

चार बिबी चालीस बच्चे असं देखील बोललं गेलं. त्यामुळे हिंदूंनी वेळेवर लग्न करून निदान पाच ते सहा मुलं जन्माला घालावीत, असं वादग्रस्त वक्तव्य देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


सनातन बोर्डाच्या निर्मिती मागणी दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वक्फ बोर्डच्या धरतीवर एक सनातन बोर्ड देखील असावे, ज्यामध्ये फक्त धर्माचार्यांचा सहभाग असावा अशी मागणी देखील केली आहे. तसेच विद्यार्थांना गुरुकुल पद्धतीनं शिक्षण दिलं जावं, ज्यामध्ये संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेंचा समावेश असावा असंही यावेळी देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने