Gautami Patil : गौतम पाटीलच्या कार्य़क्रमात राडा, प्रेक्षक म्हणाले असं सोडून जायचं नाय!



ब्युरो टीम : राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय… यासह विविध गाण्यांवर डान्स करणाऱ्या गौतमी पाटील हिलाच अहमदनगर जिल्ह्यातील एक कार्यक्रम पूर्ण न करताच सोडून जाण्याची वेळ आली.  जिल्ह्यातील राहाता येथे एका वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बाउन्सर व पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण त्यानंतरही या कार्यक्रमात तुफान राडा झाला असून हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर करावा लागला. यासर्व प्रकाराचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय.


राहाता येथे काल,गुरुवारी रात्री गौतमी पाटीलचा आयोजित नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. गौतमीचा डान्स सुरू होताच काही प्रेक्षकांनी तिच्यावर पैशांची उधळण सुरू केली. त्यामुळे तिने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला, आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली.  मात्र, गौतमीनं डान्स थांबवताच प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना  बाऊन्सरसह आयोजकांची दमछाक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला. यासर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ होण्याचे प्रमाण वाढू लागले असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणीही काहीजणांकडून करण्यात येऊ लागली आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने