ब्युरो टीम: राज्याचे महसूलमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले होते. परंतु अचानक काही जणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घालायला सुरुवात
केली त्यामुळे पोलिसांना आपला पोलिसी खाल्या दाखवत हुल्लाद्बाजना आवरण्यासाठी
लाठीचार्ज करावा लागला.
गौतमीचा डान्स सुरू
असताना काही प्रेक्षकांकडून पैशांची उधण करण्यात आली, यावरूनच हा गोंधळ
सुरू झाला. या गोंधळामुळे गौतमीने डान्स थांबवला. डान्स थांबवण्यामुळे गोंधळ आणखी
वाढला. प्रेक्षकांनी कार्यक्रमस्थळी राडा घालण्यास सुरुवात केली.
कार्यक्रमस्थळी 60
बाऊन्सर असताना देखील प्रेक्षकांना आवरताना आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी
आयोजकांनी आवाहन करूनही प्रेक्षक
ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर
प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. या राड्यानंतर कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.
गौतमीला मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आलं.
टिप्पणी पोस्ट करा