बापट यांनी प्रकृती ठीक नसताना प्रचाराला हजेरी लावली. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. यावेळी पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अखेरच्या क्षणी भाजपाने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली.
टिप्पणी पोस्ट करा