Happy Teddy Day : का साजरा केला जातो टेडी डे? वाचा...



ब्युरो टीम : व्हॅलेंटाइन विक मधील चौथा दिवस म्हणजे सर्वांचा आवडता दिवस. कारण या दिवशी भेट म्हणून टेडी देण्याची पद्धत आहे. आज 'टेडी डे' साजरा होत आहे. आपल्या आवडत्या व्यक्तिला टेडी द्यायचं तुह्मी ठरवलं असेलच. पण तुम्हाला देखील  प्रश्न पडला असेल की, टेडी डे का साजरा केला जातो? चला तर आज आह्मी याबाबत माहिती देणार आहोत.

वर्षातील सर्वात रोमँटिक आठवड्याची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते. यात चौथा दिवस म्हणजेच १० फेब्रुवारी टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी आपल्या जोडीदाराला टेडी देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

पण तुह्माला माहिती आहे का, अमेरिकी राष्ट्रपती थियोडोर रुजवेल्ट यांच्यामुळे आणि त्यांच्या टोपणनावामुळे टेडीबेअरचा अविष्कार झाला. एका व्यावसायिक जोडप्याने ते बनवले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्यामागे मुलीच कारणीभूत आहेत. बहुतांश मुलींना सॉफ्टटॉय आवडतात. मुलं आपल्या प्रेयसीला हे टेडीबेअर भेट म्हणून देऊन यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच १० फेब्रुवारीला टेडी डेचा देखील व्हॅलेंटाईन वीकमध्ये समावेश करण्यात आला.

सध्या व्हॅलेंटाइन विक सुरू असून त्यामधील रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे साजरे करून झालेत. आज टेडी डे साजरा केला जात आहे. या दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला क्युट टेडी गिफ्ट करून तुम्ही प्रेमाचा वर्षाव करू शकता. काही कारणास्तव तुमचा जोडीदार जर तुमच्या सोबत नसेल तर निराश होऊ नका. तुमच्या जोडीदाराला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने टेडी तुम्ही पाठवू शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने