ब्युरो टीम : व्हॅलेंटाइन विक मधील रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे साजरे करून झाले. आज टेडी डे आहे. आज तुह्मी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला क्युट टेडी गिफ्ट केला असेल. पण तुम्हाला माहिती आहे टेडीबेअरचा नेमका इतिहास काय आहे? चला तर, याबाबत आज महत्त्वपूर्ण गोष्ट जाणून घेऊया.
काय आहे टेडी बेअरचा इतिहास?
१४ नोव्हेंबर १९०२ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती थियोडोर रुजवेल्ट मिसिसिपीच्या एका जंगलात शिकारी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत सहाय्यक हॉल्ट कोलीर सुद्धा होता. या ठिकाणी कोलीर याने काळ्या रंगाच्या एका जखमी अस्वलाला पकडले, आणि त्याला झाडाला बांधले. यानंतर सहाय्यकाने राष्ट्रपतींकडे अस्वलाला गोळी मारण्याची परवानगी मागितली. मात्र अस्वलाला जखमी अवस्थेत बघून राष्ट्रपतींना वाईट वाटले. त्यांनी या जनावराची हत्या करण्यास नकार दिला. १६ नोव्हेंबरला ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्रात या घटनेवर आधारित एक छायाचित्र छापून आले, जे व्यंगचित्रकार क्लिफोर्ड बॅरिमन यांनी बनवले होते.
आणि टेडी नाव पडले?
वृत्तपत्रातील चित्र पाहून, व्यापारी मॉरिस मिचटॉम यांना अस्वलाच्या पिल्लाच्या आकारात खेळणी बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी आपल्या पत्नीसोबत त्याची रचना केली. या खेळण्याचं नाव 'टेडी' असं ठेवण्यात आलं. या खेळण्याचं नाव टेडी ठेवण्यामागचं कारण म्हणजे राष्ट्रपती रुजवेल्ट याचे टोपणनाव 'टेडी' असे होते. हे खेळणे राष्ट्रपतींना समर्पित होते, म्हणून व्यावसायिक जोडप्याने त्यांचे नाव वापरण्याची परवानगी घेऊन हे खेळणे बाजारात आणले.
टिप्पणी पोस्ट करा