Health: हळदी करेल आपले वजन कमी: अवलंबा या तीन पद्धती

 


ब्युरो टीम: वाढते वजन कमी करण्यसाठी आपण वेगवेगळे प्रयोग करता असतो . परंतु या उपायांमध्ये हळद तुंच्यासाठी फायदेमंद ठरू शकते. हळदीचा वापर करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.  बहुतेक लोक स्वयंपाकासाठी हळद वापरतात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी हळदीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. चला तर मग या लेखात हळदीने वजन कमी कसे करायचे ते पाहूयात...

हळद आणि वजनाचा संबध काय

हळदीच्या वापर करून अनेक प्रकारे आपण वजन कमी करू शकता . खरं तर, हळदीमध्ये क्युरक्यूमिन नावाचे पॉलिफेनॉल संयुग असतात. जे मेटाबॉलिक इंफ्लेमेशन वाढविण्यात मदत करू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज हळद वापरत असाल तर तुमचे वजन लवकरच कमी होईल.

हळद दूध

वजन कमी करण्यासाठी हळदीच दूध खूप फायदेशीर आहे. हे दूध पिण्यासाठी एक ग्लास दूधात चिमूटभर हळद मिक्स करा. दूधाचे सेवन रात्री झोपण्याआधी करावे. हे तुमचे मेटाबॉलिज्म वाढवेल. यासोबतच शरीराची सूजही कमी होईल. हळदीचे दूध तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवू शकते.

हळद चहा

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी हळदीचा चहाही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एक कप पाण्यात एक चिमूटभर हळद आणि दालचिनीचे तुकडे टाकून चांगले उकाळून घ्या. आता हे पाणी एका कपमध्ये गाळून त्यात मध मिसळा आणि ते  प्या. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

हळद पाणी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही हळदीच्या पाण्याचं सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यात एक चिमूटभर हळद मिक्स करा आणि ते पाणी थोडं गरम करा. आता या पाण्याला रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. जेणेकरुन तुमचं वजन लवकरच कमी होईल.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने