Heart Health : पांढरा मध कधी खाल्ला आहे का? वाचा फायदे




ब्युरो टीम : तुम्ही तपकिरी रंगाचा मधाबाबत आतापर्यंत ऐकले असेल, व हा मध अनेकदा खाण्यातही आला असेल. पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा मध चाखला आहे का ? पांढरा मध हा एक वैशिष्टपूर्ण मध आहे. हा मध नॉर्मल मधाच्या तुलनेत अधिक पौष्टिक गुणांनी परिपूर्ण असतो.

पांढऱ्या रंगाचा हा मध कच्चा मध म्हणून ओळखला जातो. हेल्थलाइन नुसार याचा उपयोग हा औषधे व उत्तम आरोग्यासाठी केला जातो. हा मध अल्फाल्फा, फायरवेड आणि पांढऱ्या त्रिदळी पानांच्या रोपट्यावरील फुलांपासून मिळतो. तर जाणून घेऊयात या मधाचे काय फायदे आहेत.

तोंड आल्यानंतर उपयोगी

जर तोंड आले असेल तर पांढऱ्या मधाचे सेवन करा. त्यामुळे तोंडामधील अल्सरपासून आराम मिळेल. जेथे तोंड आले आहे, तेथे पांढरा मध लावा. सातत्याने तोंड येण्याची समस्या असणाऱ्या व्यक्तीला यापासून फायदा मिळेल.

अशक्तपणाची समस्या दूर होते

हे मध रोज कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. याचे सेवन केल्याने महिला अशक्तपणासारख्या समस्यांपासून सुरक्षित राहतात.

खोकल्यापासून आराम

खोकल्यापासून त्रास होत असेल, तर पांढऱ्या मधामुळे खूप फायदा होता. पाणी उकळून त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि पांढरा मध घालून ते पिल्यानंतर खोकल्यापासून आराम मिळेल. सतत खोकल्याचा त्रास होणाऱ्यांना या मधाचा फायदा होईल.

पचनक्रिया सुधारण्यास मदत

पोटाच्या अल्सरसारख्या समस्यांमध्ये पांढरा मध हा खूप फायदेशीर ठरतो. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील याची मदत होते. त्यासाठी दररोज एक चमचा पांढरा मध हा रिकाम्या पोटी घ्या.

हृदय  राहते  निरोगी

पांढऱ्या मधाला अँटीऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी अनेक पोषक तत्त्वे असतात. फ्लेव्होनोइड्स आणि फिनोलिक ही संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे खाल्यामुळे वृद्धत्वाचे परिणामांना कमी केले जाते. तसेच आपले हृदय  सुद्धा निरोगी राखले जाते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने